श्री क्षेत्र अश्वलिंग देवस्थान, पिंपळवंडी आपले स्वागत करीत आहे

श्री क्षेत्र अस्वलिंग संस्थान आपल्या परिसरातील व जिल्यातील सर्वात पुरातन स्थान आहे. ज्या गंगाभारती महाराजांनी या शिवमंदिराचा जीर्णीद्धार केला त्यांच्या पासून आजपर्यंत येथे १३ पिढ्या जालेल्या आहेत हे संस्थान एकांताचे असून अनेक दैव चमत्कार या ठिकाणी घडलेले आहेत.मानसिक समाधानाचे हे अतिउच्च शिखर आहे. ही साधनेची श्रेष्ठभूमी आहे. त्यागी जीवनाची शिकवण देणारी हि जागा आहे. भक्ती प्रेमाचे हे माहेर आहे. निसर्गासी आणि प्राणी मात्रासी मैत्री जोडणारे हे पीठ आहे. कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे येथील

भुमी आहे. येथे अनेक मंदिरे व देवी देवता आहेत. या पवित्र क्षेत्राच्या इतिहासाबाद्ल माझ्या अल्प  प्रयासाबद्धल तुम्ही सुजान सज्जन भाविकांनी मला आपला म्हणावे ही त्या करूणा वरूणालय भगवन चंद्रशेखर चंद्रमौळी परमात्मा शिवशंकराच्या चरणी prathana करतो व माझ्या गुरुदेवांचे चरणी वंदन करतो. या web चुका माझ्या बुद्धिचा दोष असे मी मानतो. आपण सर्व भाविकास प्रेमपूर्वक सप्रेम नमस्कार करून प्रस्तावना समाप्त करतो